नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चुंचाळे शिवारात किरकोळ भांडणाच्या वादातून दोघांनी एका तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश बोराडे व विकास बनसोडे (रा.दोघे घरकुल योजना,चुंचाळे) असे संशयित दोघा हल्लेखोरांची नावे आहेत. याप्रकरणी सुरज सुभाष जाधव (२३ रा.चुंचाळे घरकुल योजना) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जाधव शनिवारी (दि.१९) रात्री घरकुल योजना भागातून पायी जात असतांना दोघांनी त्यास गाठले. यावेळी संशयितांनी किरकोळ भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. याप्रसंगी सतप्त बोराडे याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत जाधव यांच्या पोटावर,कमरेवर आणि डावे मांडीवर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले असून दोघे संशयित घटनेनंतर पसार झाले आहेत. अधिक तपास पोलिस नाईक टिळेकर करीत आहेत.