नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागातून पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरट्यांनी चोरुन नेल्या. पहिला घटना अंबड लिंकरोड भागात घडली. दिनेश मधुकर भागेश्वर (रा.भोर टाऊनशिप,अंबड लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भागेश्वर यांची स्प्लेंडर एमएच १९ डीएम ७३९३ गेल्या मंगळवारी (दि.१) रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत. दुसरी घटना आयुश बालरूग्णालय परिसरात घडली. येथील धात्रकफाटा भागात राहणारे शिवाजी दिगंबर गंभीरे (रा.बळीराज नगर) हे गेल्या मंगळवारी (दि.१) सकाळी कामानिमित्त निमाणी भागात गेले होते. आयुश बालरूग्णालय परिसरात त्यांनी आपली मॅस्ट्रो मोपेड एमएच १५ ईसी ९५५४ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोर करीत आहेत. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.