बारदान फाटा येथे भरधाव दुचाकीवरून पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोडवरील बारदान फाटा येथे भरधाव दुचाकीवरून पडल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मुलासमवेत महिला पाठीमागे बसून प्रवास करीत होती. सविता अंकुश सराफ (रा.अशोकनगर,सातपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सराफ या गुरूवारी दुपारच्या सुमारास मुलाच्या मोटारसायकलवर बसून गंगापूररोडने आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. बारदान फाटा भागात भरधाव दुचाकीवरून त्या पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने मुलगी डॉ.दिपलक्ष्मी सराफ यांनी त्यांना तात्काळ कासलीवाल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ.समर्थ चव्हाण यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.
बाथरूममध्ये चक्कर येवून पडल्याने २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर दुमाला येथे बाथरूममध्ये चक्कर येवून पडल्याने २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. निलेश सुरेश सिंघानी (रा.मारूती मंदिराजवळ,वडनेर दुमला) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिघांनी बुधवारी (दि.२) रात्री आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये अचानक चक्कर येवून पडला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास वर्मी मार लागल्याने बहिण गिताबाई सटोटे यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले.