नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत रस्त्याने पायी जात असताना एका मद्यपीने हॉटेलचालक तरूणावर कटरने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद नारायण जाधव असे कटरने हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नजीर अफताब खान (२० रा.पुनम हॉटेल,अंबडगाव)यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खान बुधवारी (दि.२) रात्री आपल्या हॉटेलमध्ये काम करीत होते. हॉटेल बाहेरील बसथांबा भागातील सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने ते पायी जात असतांना ही घटना घडली. बाथरूमला जात असतांना मद्याच्या नशेत असलेल्या संशयिताने वाट अडवित वाद घातला. यावेळी संशयिताने शिवीगाळ केल्याने खान यांनी त्यास शिवीगाळ करू नकोस असे बजावल्याने संतप्त मद्यपीने त्याच्या गळयावर कटरने हल्ला केला. या घटनेत गळा कापला गेल्याने हॉटेल चालक तरूण जखमी झाले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.