नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लॅमरोड भागात पती समवेत दुचाकीवर प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील पर्स चोरट्यांनी हिसकावून नेली. या पर्समध्ये रोकड व दोन मोबाईल असा ५२ हजाराचा ऐवज होता. या चोरीप्रकरणी इशु हसानंद मेवाणी (रा.अमरोलीया पार्क,डॅमिनॉज जवळ) यांनी तक्रार दाखल केली असून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेवाणी या गेल्या रविवारी (दि.२३) पतीसमवेत नाशिकरोड येथे गेल्या होत्या. मेवाणी दाम्पत्य रात्री आपल्या घरी जात असतांना ही घटना घडली. नाशिकरोडकडून देवळाली कॅम्पच्या दिशेने मेवाणी दुचाकीवर प्रवास करीत असतांना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी इशु मेवाणी यांच्या गळय़ातील पर्स हिसकावून नेली. या पर्समध्ये ४० हजाराची रोकड आणि दोन मोहाईल असा सुमारे ५२ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोरे करीत आहेत.