नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र हायस्कूल जवळ भरधाव दुचाकी घसरल्याने ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विजय मधूकर फुलपगार (रा.बालाजी नगर मोरे मळा,पंचक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फुलपगार हे रविवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर घराकडे जात असतांना हा अपघात झाला होता. उपनगरकडून ते जेलरोडच्या दिशेने प्रवास करीत असतांना महाराष्ट्र हायस्कूल भागात भरधाव दुचाकी घसरली होती. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयातून आडगाव मेडिकल कॉलेज येथे हलविले असता सोमवारी (दि.२४) उपचार सुरू असतांना डॉ.तृप्ती हिवराळे यांनी मृत घोषीत केले. याबाबत डॉ.संजय मानेकर यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.