नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -तारवाला लिंकरोड भागात उघड्या घरात शिरून चोरट्यांनी चार्जींगला लावलेला मोबाईल चोरून नेला. विद्या संजय कोरडे (रा.ओंकार रो हाऊस,ठक्कर कॉलनी,रेशीमबंध लॉन्स शेजारी) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरडे कुटूंबिय गेल्या मंगळवारी (दि.११) आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून चार्जींगला लावलेला महागडा मोबाईल चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक लिलके करीत आहेत.