नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही चोरीच्या घटना मुंबई नाका पोलिस स्थानक हद्दीत घडल्या. पहिली घटना चिरंजीव हॉस्पिटल भागात घडली नाशिकरोड येथील प्रशांत दत्तात्रेय विसपुते (रा.गंभर्वनगरी,मोटवाणीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. विसपुते गुरूवारी चिरंजीव हॉस्पिटल परिसरात कामानिमित्त आले होते. साई स्क्वेअर इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांना आपली दुचाकी एमएच १५ जीझेड ३०३८ पार्क केली असता चोरट्यांनी ती चोरून नेली. दुस-या घटनेत रोशन शंकर पवार (रा.जमिन अपा.बोधलेनगर बसस्टॉप) यांची पल्सर एमएच १५ एचएफ ४७०९ गेल्या गुरूवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. दोन्ही गुन्ह्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.