नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावात हॉटेल व्यावसायीक बापलेकांनी शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअर्स चालकास बेदम मारहाण केली. या घटनेत मेडिकल दुकानदार जखमी झाला आहे. याप्रकरणी दिनेश प्रकाश चोपडा (रा.जैन भवन शेजारी,देवळालीगाव) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश म्हस्के, आकाश म्हस्के आणि त्यांचा एक साथीदार अशी मेडिकल दुकानदारास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. चोपडा यांचे आपल्या घराशेजारीच श्रीमान टॉवर या इमारतीत मयुर मेडिकल व जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुकानात असतांना मेडिकल दुकानासमोरील हॉटेल मालक म्हस्के बापलेकांसह एकाने कुठलेही कारण नसतांना दुकानासमोर येवून चोपडा यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत चोपडा यांना काऊंटरवर ढकलून देण्यात आल्याने काच फुटून ते जखमी झाले असून, शेजारी राज आहिरे यांनी त्यांना तात्काळ जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.