नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंदुकीच्या गोळीचा धाक दाखवून एका युवकाकडून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास करणा-या तरुणाविरुध्द गंगापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लुबाडणूकीची तक्रार सारंग मकरंद पटेल (वय ४५, रा. माणिकनगर, गंगापूर रोड, नाशिक) यांनी दिली आहे. आरोपी अथर्व देशमुख (रा. आनंदवल्ली गाव, गंगापूर रोड, नाशिक) याने पटेल यांचा मुलगा ओजस पटेल याला बंदुकीची गोळी मारण्याचा धाक दाखवून हा गंडा घातला आहे. अथर्वने त्याच्या धमकीमुळे घरातील ४ लाख ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व हिर्याच्या अंगठ्या घरातील कपाटातून काढल्या. त्यानंतर त्याने आरोपी अथर्व देशमुख याला हे सर्व दागिने घराजवळ दिले. हा सर्व प्रकार सारंग पटेल यांना समजल्यानंतर त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर त्यांनी रितसर तक्रार केल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व लुबाडणूक प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.