नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर तब्बल सात वर्ष बलात्कारा केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्कारासह कुटूंबियांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील भावसार,मिना भावसार व गुलाब भावसार (रा.सर्व मॉडेल कॉलनी,जेलरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे निखील भावसार याच्याशी प्रेमसंबध होते. नोव्हेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०२१ दरम्यान संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून पिडीतेवर वेळोवेळी बलात्कार केला. राहत्या घरी बोलावून घेत तसेच मित्रांच्या घरी, शिर्डी येथे घेवून जात त्याने हे कृत्य केले. पिडीतेने विवाहाचा तगादा लावला असता संशयिताने आपल्या कुटुंबियांच्या कानी हा प्रकार घातला. मात्र आई व वडिलांनी खालच्या जातीची असल्याबाबत हिनवल्याने त्याने लग्नास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, याप्रकरणी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात बलात्कारासह अनुसूचित जाती जमाती अधिनियम अन्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक धुमाळ करीत आहेत.