नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर परिसर आणि गंगापूर शिवारात एकाच रात्रीत पार्किंगमध्ये लावलेल्या ७ रिक्षांचे ११ टायर चोरीस गेल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या घटनेमुळे रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी ६ रिक्षांचे टायर चोरले असून त्यात एका रिक्षाचे तीन तर काहींचे १ व २ असे टायर चोरट्यांनी लंपास केले. रिक्षाचालक जयवंत कचरू पालवे हे सकाळी उठल्यानंतर ते रिक्षाकडे गेले. यावेळी त्यांच्या रिक्षाचे तीन्ही टायर चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळले. त्यानंतर त्यांना इतर ठिकाणी चोरट्यांनी अशीच चोरी केल्याचे निदर्शनास आले.