नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारखान्याच्या शटरचा पत्रा उचकटून चोरट्यांनी सुमारे ४० हजार रूपये किमतीचे टर्मिनल बॉक्स चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली आहे. या चोरीप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण पांडूरंग जुंद्रे (३४ रा.प्रशांतनगर,पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली आहे. जुंद्रे यांचा औद्योगीक वसाहतीतील नंदिनीनगर भागात उन्नती इंजिनियर्स नावाचा कारखाना आहे. शनिवारी साप्ताहीक सुट्टी असल्याने कारखाना बंद असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद कारखान्याच्या शटरचा पत्र उचकटून कारखाना आवारातील टर्मिनल बॉक्स भरलेल्या १६ बॅगा चोरून नेल्या. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.