नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन जण ठार तर एक जण जखमी झाला आहे. पहिल्या अपघातात बसच्या धडकेत ५३ वर्षीय पादचा-याचा मृत्यू झाला. तर दुस-या अपघातात भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाला आणि याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात व पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश खंडू शार्दुल (५३ रा.भिमवाडी,लॅमरोड) हे बुधवारी रात्री लॅमरोडवरील भाटीया कॉलेज कडून विहीतगावच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. भाटीया कॉलेज समोर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रव्हल्सच्या खासगी बसने एमएच १५ ५७५८ शार्दुल यांना जोरदार धडक दिली. या अपघातात डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने नजीकच्या अॅशवर्ड हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ. अमित अदाते यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.
दुसरा अपघातात सातपुर कॉलनीतील विश्वनाथ कदम व संतोष पाल हे दोघे मित्र गुरूवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास के.के.वाघ महाविद्यालयाकडून आपल्या अॅक्टीव्हावर एमएच १५ एचजे ६८६० महामार्गाने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. उड्डाणपूलावरून द्वारकाच्या दिशेने दोघे मित्र प्रवास करीत असतांना पंचवटी कॉलेज समोर पाठीमागून भरधाव येणाºया कंटेनरने एनएल ०१ एए ३९१९ दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेल्या संतोष पाल याचा मृत्यू झाला तर विश्वनाथ कदम गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कदम याच्या तक्रारीवरून कंटेनर चालक निर्मल बलकार सिंग (रा.उत्तरप्रदेश) याच्याविरूध्द पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत. दुसरा अपघात देवळाली कॅम्प येथे झाला.