नाशिक : खडकाळी येथील समाज मंदिर जवळ हद्दपारीची कारवाई केलेली असतांना वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नावेद उर्फ नाना शफीक शेख (२४ रा.रसूलबाग कब्रस्तान समोर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. शेख याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास पोलिसांनी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.१५) सायंकाळी तो खडकाळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून संशयितास जेरबंद करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक व्ही.डी.काठे करीत आहेत.