नाशिक : घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८३ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना ध्रुवनगर येथील मोतीवाला कॉलेज भागात घडली. या घरफोडीत ३० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. अक्षय दिलीप जाधव (रा.यशराज विहार अपा.गुलमोहर कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव कुटुंबिय रविवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटातील रोकडसह दागिणे असा सुमारे ८२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.