नाशिक – तब्बल नऊ वर्षापूर्वी खून करून फरार झालेल्या उत्तरप्रदेशच्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी असे आहे. ४ मार्च २०१३ रोजी मेहबूब नगर वडाळा येथे खून करुन हा आरोपी फरार झाला होता. त्यानंतर याप्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या आरोपींनी गळा आवळून सलाम नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. त्यानंतर या आरोपीने रुमला बाहेरुन कुलुप लावून फरार झाला होता. पोलिस या आरोपीचा शोध घेत असतांना पोलिस हवालदार चंद्रकांत गवळी यांना हा आरोपी मुंबईत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचा शोधासाठी पोलिसांचे पथक मुंबईला रवावा झाले. हा आरोपी नवी मुंबई येथील रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घनसोली परिसरातून आरोपी सापडला. त्याला इंदिरा नगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे. पोलीस हवालदार नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पालखेडे हे पथकात होते. गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि वरिष्ठ यांनी अभिनंदन केले आहे.