नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८० हजाराच्या मुद्देमाल लंपास केला. नाशिकरोड येथील आर्टीलरीरोड भागात ही घरफोडी झाली. यात चोरट्यायंनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे आणि देवाच्या मुर्ती चोरुन नेल्या. याप्रकरणी प्रसाद राजेंद्र डोईफोडे (२७ रा.इश्वर बंगला,जैन कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोईफोडे कुटुंबिय शनिवारी (दि.१३) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्याच्या किचनच्या सेफ्टी दरवाजाची जाळी तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातून रोकड, सोन्याचांदीचे दागिणे व देवघरातील चांदीच्या मुर्त्या असा सुमारे ८० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.
फार्म हाऊसच्या वॉल कंपाऊडला लावलेले लोखंडी अँगल चोरीला
पिंपळगाव खांब भागात फार्म हाऊसच्या वॉल कंपाऊडला लावलेले लोखंडी अँगल चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय दामू बेटे (५० रा.रायगड चौक, शिवाजीनगर वडनेर दुमाला) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बेटे यांचे पिंपळगाव खांब ता.जि.नाशिक येथे श्री सप्तशृंगी नावाचे फार्म हाऊस असून दि.११ ते १४ मे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फार्म हाऊसच्या वॉल कंपाऊड साठी वापरलेले सुमारे २ हजार ४०० रूपये किमतीचे लोखंडी अँगल कापून नेले. अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.