नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गाव भागात म्हसोबा मंदिरामागे असलेल्या हरी श्रद्धा अपार्टमेंट मध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास शिबान शेख बबलू या २७ वर्षीय युवकावर चार ते पांच जणांनी जीवघेणा हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
हरी श्रद्धा अपार्टमेंट मध्ये राहणारा शिबान हा आपल्या घरी जात असताना चार हल्लेखोरांनी हातात तलवारी, कोयते आदी तीक्ष्ण हत्यारांनी जबर वार करून शिबान यास जखमी केले. शिबन शेख बबलू याच्यावर इतके वार झाले की त्याला उठता सुद्धा येत नव्हते, त्याला त्वरित नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
शिबान शेख याच्यावर गेल्या दोन तासांपासून उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या जीवघेणा हल्ल्यामुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. नाशिक शहरात जीवघेणे हल्ले, खून, दरोडे, तसेच चोऱ्यांचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढले असून पोलिसांचे गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने नागरिक भयभीत आहेत. हल्ल्याचा संपूर्ण जीवघेणा हल्ल्याचा थरार सी सी टीव्ही मध्ये कैद झाला असून उपनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1653693110566944768?t=UqZTQi8M2Scrz1LO9-CPnw&s=03