नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीत रस्त्याने फोनवर बोलत जाणा-या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रशांत बबनराव बोडके (३१ मुळ रा.संभाजीनगर हल्ली इच्छामणी गणपती मंदिराजवळ उपनगर) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोडके रविवारी (दि.३०) सातपूर औद्योगिक वसाहतीत गेले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळील रेणूका लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीसमोरून ते मोबाईलवर बोलत पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.