नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. आता यासंदर्भात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, श्री शरद पवार साहेबांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरु आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू. मी अजून श्री शरद पवार यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणार नाही. मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, ते योग्य वेळी लिहिणार आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे आणि सत्य काय आहे, हे मी त्यात मांडीन, असे फडणवीसांनी स्पष्ट केले.
श्री शरद पवार साहेबांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरु आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू.
मी अजून श्री शरद पवार यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे… pic.twitter.com/doVOTWrmyQ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 2, 2023
Devendra Fadnavis on Sharad Pawar Decision Politics