नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयत्याचा धाक दहशत निर्माण करणा-या गावगुंडास पोलिसांनी गजाआड केले आहे. दिपक सुनिल घाटोळे (१९ रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, संत कबीरनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित कोयताधारीचे नाव आहे.
शरणपूररोड भागातील राका गार्डन भागात संशयिताच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरणपूररोडवरील राका गार्डन भागात एक तरूण धारदार कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत दत्तगुरू वडापाव सेंटर समोर भागात संशयिताच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईत त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई सागर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.