गुरूवार, ऑक्टोबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महापालिकेच्या वाहनचालकावर खूनी हल्ला; सात जणांवर गुन्हा दाखल

जुलै 23, 2022 | 3:43 pm
in क्राईम डायरी
0
fir.jpg1

नाशिक : त्र्यंबकरोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप भागात मद्याच्या धुंदीत सात जणांच्या टोळक्याने लुटमार करीत महापालिकेच्या वाहनचालकावर खूनी हल्ला केला. सरकारी वाहनातून घरी सोडले नाही या कारणातून हा हल्ला करण्यात आला. या घटनेत टोळक्याने चालकाच्या खिशातील रोकडसह सोनसाखळी बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून, न्यायालयाच्या आदेशान्वये याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न,सरकारी कामात अडथळा आणि लुटमारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश दैत्यकर,विक्की अहिरे,विवेक निकम,योगेश देशमुख (रा.सर्व कामगारनगर), शरद रोकडे (रा.चांदशी) व त्यांचे दोन साथीदार अशी मनपा कर्मचा-यावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहे. याप्रकरणी विजय चिंधू दरेकर (रा.कामगारनगर,सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. दरेकर हे महापालिका कर्मचारी असून ते गेल्या २ एप्रिल रोजी रात्री सेवाबजावून शासकिय वाहन घेवून आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली होती. रिलायन्स पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या परिचीतांनी वाहन अडवित त्यांना थांबविले. मद्यधुंद असलेल्या टोळक्याने आम्हा सर्वांना तू घरी सोड असा आग्रह धरला. मात्र चालक दरेकर यांनी तुम्ही दारूच्या नशेत असल्याने सरकारी वाहनातून घरी सोडता येणार नाही असे सांगितल्याने संतप्त टोळक्याने शिवीगाळ करीत तुझ्या बापाची गाडी आहे का असे म्हणत धक्काबुक्की व मारहाण केली. या घटनेत टोळक्याने दरेकर यांना पकडून ठेवले असता एका संशयिताने त्यांच्या खिशातील दोन हजाराची रोकड तर दुस-याने सोनसाखळी बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. याबाबत दरेकर यांनी पोलिसात धाव घेतली होती. मात्र दाद न मिळाल्याने त्यानी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरधाव दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या धडकेत चालकाचा मृत्यू

Next Post

सिटी लिंक बसमधून महिलेच्या पर्समधील रोकड, दागिने चोरटयांनी केले लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
इतर

असा असेल तुमचा १६ ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या गुरुवारचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 15, 2025
maha gov logo
महत्त्वाच्या बातम्या

नांदूरमध्यमेश्वरच्या ‘त्या’ जागेच्या प्रकरणात खळबळजनक बाब समोर… तहसिलदारांसह उपअधिक्षकांचे काय होणार?

ऑक्टोबर 14, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

दिवाळीपूर्वीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय…

ऑक्टोबर 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या १५ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 14, 2025
महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

सिटी लिंक बसमधून महिलेच्या पर्समधील रोकड, दागिने चोरटयांनी केले लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011