नाशिक – तिडके कॉलनीतील सत्यम स्विटस दुकानाजवळ भरधाव दोन मोटारसायकलींमध्ये झालेल्या धडकेत एका चालकाचा मृत्यू झाला. दिपक मधुकर सोनवणे (३५ रा.दत्तमंदिर,त्रिमुर्तीचौक सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोनवणे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनवणे गेल्या मंगळवारी रात्री मुंबईनाक्या कडून त्रिमुर्तीचौकाच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. सत्यम स्विट भागात दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरील धडकेत ते गंभीर जखमी झाले होते कुटूंबियांनी त्यांना तात्काळ नजीकच्या संकल्प हॉस्पिटल येथे दाखल केले होते. सलग दहा दिवस अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी (दि.२२) वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक बहिरम करीत आहेत.