नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्ग बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना मुंबई येथील वृद्ध महिलेच्या पर्स मधील दागिणे चोरट्यांनी लंपास केले. या घटनेत तब्बल पावणे दोन लाख रूपये किमतीचे अलंकार चोरीला गेले आहे. याप्रकरणी निलीमा नरेश सुर्वे (६७ रा.घाटकोपर,मुंबई) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुर्वे नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आल्या होत्या. रविवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बसस्थानकात पोहचल्या असता ही घटना घडली. दीडच्या सुमारास त्या मुंबई नाशिक बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन उघडून पाकिट चोरून नेले.
या पाकिटात सुमारे १ लाख ८० हजार रूपये किमतीचे दागिणे होते. बस सुटण्यापूर्वी तिकीटासाठी पैसे काढत असतांना ही बाब निदर्शनास आल्याने सुर्वे यांनी तात्काळ बसखाली उतरत पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेळके करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1647867494504472576?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1647844873398288387?s=20