नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील सावतानगर भागात पेटता दिवा अंगावर पडल्याने भाजलेल्या ७४ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. गेली २४ दिवस महिला मृत्युशी झुंज देत होती. सुशिला भगिरथ ध्रुत (रा.जाजू पार्क, सावतानगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुशिला ध्रुत या गेल्या २३ मार्च रोजी वीज पुरवठा खंडीत झाल्याने दिवा पेटवित असतांना ही घटना घडली होती. भिंतीवर ठेवलेला पेटता दिवा अंगावर पडल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. जावई दगडू हेडा यांनी त्यांना तातडीने गुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गेली २४ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असतांना रविवारी डॉ.अमोल आहेर यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास बनतोडे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1647891607734349824?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1647867524024004612?s=20