सिटीसेंटर मॉलमधील इलेक्ट्रीक शॉपीमधून ६० हजार रूपये किमतीचे लॅपटॉप चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिटीसेंटर मॉलमधील इलेक्ट्रीक शॉपीमधून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत यादव सोनवणे (रा.गुरूअमृतनगर,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे सिटीसेंटर मॉलमधील रिलायन्स डिजीटल स्टोअर्समध्ये काम करतात. गेल्या २२ मार्च रोजी ते स्टोअर्सच्या लॅपटॉप व प्रिंटर विभागात काम करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी लेनावा कंपनीचा सुमारे ५९ हजार ५५९ रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.
शहरात वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी सरकारवाडा आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना कॉलेजरोड भागात घडली. कुलदिप संदिप कुमावत (रा.हंस नगरी,श्रमिकनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कुमावत गुरूवारी रात्री थत्तेनगर भागात गेले होते. चिंतामणी बिल्डींगच्या दिग्ज सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या पार्कि गमध्ये त्यांनी आपली एमएच १५ एचजे ०७०७ दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत. दुसरी घटना शरणपूररोडवर घडली. विनय बाळकृष्ण आवड (रा.मनिषा सोसा.नवीन पंडीत कॉलनी) यांची एमएच १५ ईएफ ५५७७ मोटारसायकल गेल्या गुरूवारी (दि.६) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यानी चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.