नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाघाडी भागात दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एकास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत वजनी वस्तू डोक्यात मारण्यात आल्याने ५६ वर्षीय इसम जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मल खलबहादूर बिका (२८, रा. तुलसी अपार्टमेंट सितागुंफा जवळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी भरत कन्हैयालाल कासोदे ( ५६,रा. निलगिरी बाग आडगाव शिवार) यांनी तक्रार दाखल केली आहे.
कासोदे बुधवारी (दि.५) रात्री वाघाडी पुलावरून पायी आपल्या घराकडे जात असतांना संशयिताने त्यांची वाट अडविली. यावेळी त्याने दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली असता कासोदे यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने शिविगाळ करीत कासोदे यांच्या डोक्यात वजनी वस्तू फेकून मारल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.
? मोठा दिलासा!
*मुंबईत साकारणार तब्बल १७ मजली टाटा कॅन्सर हॉस्पिटल*
या सुविधा मिळणार
https://t.co/xjyQhAUhRC#indiadarpanlive #mumbai #17floor #tata #cancer #hospital #treatment #health— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 6, 2023
⬜ *या सरकारी योजनेतून तब्बल १२ हजार युवकांना मिळाले कर्ज…* तुम्हालाही मिळू शकते…
असा घ्या लाभ…
https://t.co/LJr3EQTb4H#indiadarpanlive #maharashtra #government #scheme #loan #benefit #12thousand #youth— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 7, 2023