नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई नाका बाजूने मदिना चौकाकडे जाणा-या मार्गावर विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करुन अचानक यू-टर्न घेतल्याने विचित्र अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. त्यांच्या ताब्यातील वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन रावसाहेब पाटील (रा.श्रमिकनगर, सातपूर) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी निसार शेख यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयिताने गेल्या मंगळवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आपल्या ताब्यातील बलेनो कार एमएच १५ जीएफ ७३१७ ही मुंबईनाक्याकडून मदिना बेकरीकडे जाणा-या मार्गावर रॉंग साईडने चालवून ओव्हरटेक करण्याच्या नादात अचानक यू टर्न घेतला. त्यामुळे दोन वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातांमध्ये दुस-या कारमधील तजिन सलिम पटेल (२६) व मुसरत सलिम पटेल (४८) हे जखमी झाले. अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642478541295206406?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642457219215286273?s=20