नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील उड्डाणपूलावर फुटलेले टायर बदलतांना भरधाव मालट्रकने धडक दिल्याने दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दोन तरूण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश खोलमकर (२८ रा.लोखंडेमळा) व विश्वनाथ कांबळे (२६ रा.मख्रमलाबाद) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी मयूर दिलीप जाधव (२४ रा.चाणक्यपूरी,पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव शुक्रवारी (दि.३१) रात्री महामार्गावरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला.
हॉटेल कोर्ट यार्ड समोरील उड्डाणपूलावर त्यांच्या वाहनाचे टायर फुटल्याने ते टायर बदलत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ३१ एपी ०७५५ या मालट्रकने जाधव यांच्या वाहनास धडक दिली. या अपघातात जाधव यांचे वाहन पुढे उभ्या असलेल्या एका वाहनावर आदळले. त्यामुळे दोघी वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात वरिल दोन जण जखमी झाले असून अधिक तपास पोलिस नाईक बिरारी करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? आरोग्य टीप्सः *उसाचा रस पिण्याचे आहेत एवढे सारे फायदे*
https://t.co/erVrEM8dBo#indiadarpanlive #health #tips #sugercane #juice #benefits #nutrition— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 2, 2023
? *कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय*
अन्य कंपन्याही घेणार?
https://t.co/Wr4fHwojkZ#indiadarpanlive #google #layoff #big #decision #memo #employees— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 2, 2023