नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात खरेदी व्यवहाराच्या कारणातून घर व दुकानाच्या ताबा घेण्याच्या इराद्याने टोळक्याने घरात शिरून एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनराज बंब आणि त्याचे ३ ते ४ साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. पाथर्डी फाटा परिसरातील स्ट्रॉबेरी हॉटेल भागातील तक्रारदाराने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित टोळक्याने शनिवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास खरेदी व्यवहाराच्या कारणातून तक्रारदार राहत असलेल्या घराचा व लगतच्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी बेकायदेशीररित्या रो हाऊसच्या गेटचे व दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले.
यावेळी तक्रारदारांच्या बहिणीने विरोध केला असता संशयित टोळक्याने त्यांना शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांचा विनयभंग केला. अधिक तपास जमादार चव्हाणके करीत आहेत.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
? आरोग्य टीप्सः *उसाचा रस पिण्याचे आहेत एवढे सारे फायदे*
https://t.co/erVrEM8dBo#indiadarpanlive #health #tips #sugercane #juice #benefits #nutrition— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 2, 2023
? *कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय*
अन्य कंपन्याही घेणार?
https://t.co/Wr4fHwojkZ#indiadarpanlive #google #layoff #big #decision #memo #employees— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 2, 2023