नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टोकन देवून खरेदी केलेल्या मालट्रकचे फायनान्स कंपनीचे हप्ते न भरल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात हायवा ट्रक खरेदी विक्रीत मुळ मालकाची फसवणुक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद दत्तू कावळे (रा.शिंदे ता.जि.नाशिक) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमोल दत्तात्रेय जाधव (रा.ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांच्या मालकिचा भारत बेंड कंपनीचा हायवा ट्रक संशयिताने ३० लाख रूपये किंमत ठरवून विकत घेतला होता. हा व्यवहार ११ फेब्रुवारी २०१९ रोजी पंचवटीतील हॉटेल राधाकृष्ण झाला होता. यावेळी संशयिताने सहा लाख रूपयांचे टोकन देत मालट्रकचा ताबा घेतला होता. या व्यवहारात मालट्रकचे श्रीराम फायनान्स कंपनीकडून घेतलेले सुमारे २४ लाखाचे कर्ज खरेदीदार संशयिताने भरण्याचे लेखी ठरविण्यात आले होते. मात्र संशयिताने कर्जाची रक्कम न भरल्याने जाधव यांनी पोलिसात धाव घेतली असून कावळे यांनी फसवणूक केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642136408633774081?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1642136376056635392?s=20