नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेलतगव्हाण येथे बंद कारखान्यात शिरून अज्ञातांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेपर कप बनविण्याचे मशिन पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेत मोठे व्यावसायिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी रवी हिरामण पाळदे (रा. पाळदे मळा, बेलतगव्हाण, ना.रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळदे यांचा पेपर कप बनविण्याचा व्यवसाय आहे. बेलतगव्हाण येथे रूद्रा एटंरप्रायझेस नावाची त्यांची फर्म असून, सोमवारी (दि.२७) रात्री अज्ञात भामट्यांनी शॉपचे कुलूप तोडून हे कृत्य केले. पेपर बनविण्याच्या मशिनवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून देण्यात आले असून या घटनेत मशिनसह कच्या व उत्पादीत केलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरची घटना व्यावसायिक स्पर्धेतून झाल्याचे बोलले जात असून अधिक तपास पोलिस नाईक वाय. डी. देवरे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641369030912282624?s=20