नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळागावात लग्नात नाचण्याच्या वादातून चार जणांच्या टोळक्याने कुटुंबियास मारहाण करुन त्यांचा छोटा हत्ती टेम्पो पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेत टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी खंडू जगन ढोकणे (रा. पिंगुळबाग, वडाळागाव) यांनी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन चंदर आंबेकर, भगीरथ जगन आंबेकर, अनिल चंदर आंबेकर व चंदर किसन आंबेकर (रा.सर्व पिंगुळबाग,वडाळागाव) अशी संशयितांची नावे आहेत. ढोकणे व आंबेकर कुटुंबियात गेल्या फेब्रुवारी महिन्यात लग्नात नाचण्याच्या कारणातून वाद झाला होता. यावेळी संशयितांनी आंबेकर कुटुंबिय व त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली होती. याच रागातून संशयितांनी गेल्या मंगळवारी (दि.२१) रात्री आंबेकर यांच्या मालकीचा छोटा हत्ती टेम्पोवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641393071303847943?s=20