नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहीतेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. हरिदास काळू गावित (३० रा. वाघ्याचीवाडी, हरसूल, ता.पेठ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटूंबिक ओळखीतून हे कृत्य करण्यात आले आहे. दोघांमध्ये वाद होवून महिलेचा मोबाईल फुटल्याने हा वाद पोलिसात पोहचला आहे.
याप्रकरणी सिडकोतील विजयनगर भागात राहणा-या विवाहीतेने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता यांच्यात कौटूंबिक ओळख असून दोघेही विवाहीत आहेत. मुळची अकोला भागात राहणा-या पीडितेशी गेल्या जानेवारी महिन्यात संशयिताशी भेट झाली होती. यावेळी महिलेने त्यास घरी बोलावले असता ही घटना घडली. पीडितेच्या घरी पोहचलेल्या संशयिताने चहापान घेत घरी कुणी नसल्याची संधी साधत महिलेवर बळजबरी बलात्कार केला. स्वतः घरी बोलावलेले असल्याने महिलेने अत्याचार सहन केला. मात्र त्यानंतर संशयिताचे येणे जाणे वाढले.
महिलेचा पती घराबाहेर पडताच संशयित तिच्या घरी येवून दमदाटी व मारहाण करून नैसर्गिक व अनैसर्गिकं संबध ठेवू लागला. यामुळे वैतागलेल्या महिलेने रविवारी (दि.२६) त्यास नकार देत कान उघडणी केली असता संतप्त संशयिताने तिला मारहाण केली एवढ्यावरच न थांबता त्याने तिचा मोबाईल फोडल्याने हा वाद पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten