India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गुगलला भारतात जोरदार दणका; तब्बल १३३७ कोटी भरावेच लागणार

India Darpan by India Darpan
March 29, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  संपूर्ण जगावर जणू राज्य करणाऱ्या गुगलला भारतात मोठा दणका मिळाला आहे. Android मधील प्रबळ स्थानाचा गैरवापर करण्याशी संबंधित एका प्रकरणात कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (CCI) दिलेला आदेश नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) ने कायम ठेवला आहे. त्यामुळे आता गुगलला 1,337.76 कोटी रुपयांचा दंड भरावाच लागणार आहे. नॅशनल कंपनी लॉ अपिलेट ट्रिब्युनल (NCLAT) ने गुगलला दंड भरण्यासाठी आणि आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे.

भारतातील कंपन्यांमधील स्पर्धेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी एजन्सी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियावर (CCI) आहे. गुगलने बाजारावर प्रभाव टाकल्याचा आरोप करत CCIने दंड ठोठावला. गुगलने या निर्णयाला एनसीएलएटीसमोर आव्हान दिले. तसेच, आपल्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे गुगलने म्हटले होते.

NCLAT चे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण आणि सदस्य आलोक श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने गुगलला निर्देशांचे पालन करण्यास आणि दंडाची रक्कम तीस दिवसांच्या आत जमा करण्यास सांगितले. यासोबतच खंडपीठाने स्पर्धा आयोगाच्या आदेशातही काही सुधारणा केल्या आहेत. एनसीएलएटीनेही गुगलचे अपील फेटाळले आहे की स्पर्धा आयोगाने तपासात नैसर्गिक न्यायाचे उल्लंघन केले आहे.

अँड्रॉईड मोबाईल उपकरणांच्या बाबतीत आपल्या वर्चस्वाचा फायदा घेऊन स्पर्धाविरोधी क्रियाकलापांमध्ये गुगल सहभागी असल्याचे गेल्या वर्षी 20 ऑक्टोबर रोजी CCI ला आढळला होते. CCI ने गुगलला 1,337.6 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीआयने गुगलला अनुचित व्यापार पद्धतींमध्ये सहभागी होण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देशही दिले होते. स्पर्धा आयोगाच्या याच निर्णयाला अपीलीय न्यायाधिकरणात आव्हान देण्यात आले होते. आता मात्र, एनसीएलएटीने अपिल फेटाळले आहे. परिणामी, गुगलला दंड भरावाच लागणार आहे.

Google Appeal Reject by NCLAT 1337 Crore Fine


Previous Post

कौटुंबिक ओळखीतून विवाहीतेवर बलात्कार; विवाहीत पुरुषाला अटक

Next Post

बिटको हॉस्पिटलजवळ दुचाकीच्या डिकीतून ५० हजार लंपास; केवल पार्कमध्ये तलवार घेऊन फिरणारा जेरबंद

Next Post

बिटको हॉस्पिटलजवळ दुचाकीच्या डिकीतून ५० हजार लंपास; केवल पार्कमध्ये तलवार घेऊन फिरणारा जेरबंद

ताज्या बातम्या

मालेगावमध्ये पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात; यासाठी मागितले ४ हजार

June 6, 2023

अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोल; आता हे आहे कारण…

June 6, 2023

आज विरोधक सक्रीय होतील; जाणून घ्या बुधवार, ७ जून २०२३चे राशिभविष्य

June 6, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – ७ जून २०२३

June 6, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – लायब्ररी

June 6, 2023

अतिखोल अरबी समुद्रातील अति तीव्र चक्रीवादळ… महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

June 6, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group