नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -घरफोडीत चोरट्यांनी सुमारे १ लाख ३८ हजाराचा ऐवज लंपास केला. सिडकोतील बडदे नगर भागात ही घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी इलेक्ट्रॉनिक सामान चोरुन नेले. याप्रकरणी विराज विश्वनाथ सुर्यवंशी (रा.विश्वशांती बंगला समर्थ नगर जुने सिडको) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुर्यवंशी कुटुंबिय २२ ते २७ मार्च दरम्यान बाहेर गावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सुमारे १ लाख ३८ हजार रूपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक्स सामान चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक संगम करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640643138611208192?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640622296007057408?s=20