India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार

India Darpan by India Darpan
March 28, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. याप्रकरणी सातपूर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या अपघातात एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तर दुस-याचा भरधाव दुचाकी घसरल्याने मृत्यू झाला.

पहिला अपघात सौभाग्यनगर भागात झाला. या अपघातात राहूल नरसिंग जाधव (रा.मधुबन सोसा.बनकर चौक,काठेगल्ली) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जाधव व निखील दिपक मोरे (रा.आकाशगंगा सोसा.काठेगल्ली) हे दोघे मित्र शुक्रवारी (दि.२४) देवळाली कॅम्प भागात गेले होते. रात्रीच्या वेळी दोघे आपल्या घरी दुचाकीने परतत असतांना हा अपघात झाला.

सौभाग्यनगर येथील डेमिनोज पिझ्झा समोर रोडवरील स्पिडब्रेकरवर भरधाव दुचाकी घसरल्याने दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील जाधव याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी मोरे याने दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत जाधव याच्याविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक विंचू करीत आहेत.

दुसरा अपघात सिएट कंपनीजवळील बाबाज बेकरी जवळ झाला. योगेश बापूसाहेब परदेशी (२७ रा. अंबड लिंकरोड,चिंचाळे शिवार) हा युवक गेल्या बुधवारी (दि.२२) सातपूर औद्योगीक वसाहतीतून आपल्या घराकडे एमएच १५ ईएम ३४८८ या दुचाकीवर जात असतांना हा अपघात झाला होता.

सिएट कंपनीजवळील बाबाज बेकरी भागात भरधाव अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आई भारती परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.


Previous Post

सिडकोतील बडदे नगरमध्ये घरफोडी; १ लाख ३८ हजाराचा ऐवज लंपास

Next Post

BSNLच्या अधिकाऱ्यावर सेवानिवृत्तीनंतर गुन्हा दाखल; हे आहे कारण

Next Post

BSNLच्या अधिकाऱ्यावर सेवानिवृत्तीनंतर गुन्हा दाखल; हे आहे कारण

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group