पार्क केलेल्या दुचाकीस लावलेली बॅग चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बोधलेनगर भागात बँके समोर पार्क केलेल्या दुचाकीस लावलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या बॅगेत सुमारे पावणे तीन लाखाची रोकड होती. याप्रकरणी अशोक तोताराम पाटील (६३ रा.इच्छामणी मंदिर रोड,उपनगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटील सोमवारी (दि.२०) एसबीआय बँकेच्या बोधलेनगर शाखेत गेले होते. बॅकेच्या पार्किंगमध्ये ते आपली दुचाकी लावून अल्पशा कामासाठी बँकेत गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ज्युपीटक दुचाकीस हॅण्डलखालील हुकला टांगलेली निळया रंगाची सॅक काढून नेली. या सॅकमध्ये २ लाख ७५ हजार रूपयांची रोकड होती. ही घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली असून चोरट्याचा शोध पोलिस घेत आहेत. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.
दुचाकीस्वार महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रवी शंकर मार्गावर महिला आईस्क्रीम खरेदीसाठी थांबली असता घटना घडली.याप्रकरणी दिपाली सुनिल वाबळे (४० रा.रेआन इंटरनॅशनल स्कूल जवळ नाशिक) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाबळे या रविवारी (दि.१९) रात्री आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर मुलांना आईस्क्रिम घेण्यासाठी रवी शंकर मार्ग भागात गेल्या होत्या. प्रेम सागर स्विट दुकानासमोर त्या आईस्क्रिम घेण्यासाठी आपल्या दुचाकीवरून उतरत असतांना डीजीपीनगरकडून काळया दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे २० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.