India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पार्क केलेल्या दुचाकीस लावलेली बॅग चोरीला; पावणे तीन लाखाची रोकड केली चोरट्यांनी लंपास

India Darpan by India Darpan
March 21, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


पार्क केलेल्या दुचाकीस लावलेली बॅग चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बोधलेनगर भागात बँके समोर पार्क केलेल्या दुचाकीस लावलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या बॅगेत सुमारे पावणे तीन लाखाची रोकड होती. याप्रकरणी अशोक तोताराम पाटील (६३ रा.इच्छामणी मंदिर रोड,उपनगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील सोमवारी (दि.२०) एसबीआय बँकेच्या बोधलेनगर शाखेत गेले होते. बॅकेच्या पार्किंगमध्ये ते आपली दुचाकी लावून अल्पशा कामासाठी बँकेत गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ज्युपीटक दुचाकीस हॅण्डलखालील हुकला टांगलेली निळया रंगाची सॅक काढून नेली. या सॅकमध्ये २ लाख ७५ हजार रूपयांची रोकड होती. ही घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली असून चोरट्याचा शोध पोलिस घेत आहेत. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.

दुचाकीस्वार महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रवी शंकर मार्गावर महिला आईस्क्रीम खरेदीसाठी थांबली असता घटना घडली.याप्रकरणी दिपाली सुनिल वाबळे (४० रा.रेआन इंटरनॅशनल स्कूल जवळ नाशिक) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाबळे या रविवारी (दि.१९) रात्री आपल्या अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवर मुलांना आईस्क्रिम घेण्यासाठी रवी शंकर मार्ग भागात गेल्या होत्या. प्रेम सागर स्विट दुकानासमोर त्या आईस्क्रिम घेण्यासाठी आपल्या दुचाकीवरून उतरत असतांना डीजीपीनगरकडून काळया दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे २० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.


Previous Post

नाशिकचा एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प डहाणूला नेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Next Post

सराईत गुन्हेगाराचा साथीदारासह धुमाकूळ; सीसीटिव्ही व वाहनांची कोयत्याने तोडफोड

Next Post
प्रातिनिधिक फोटो

सराईत गुन्हेगाराचा साथीदारासह धुमाकूळ; सीसीटिव्ही व वाहनांची कोयत्याने तोडफोड

ताज्या बातम्या

डिप्लोमा इंजिनीअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू…. येथे करा अर्ज… यंदा अशी राहणार प्रक्रिया

May 31, 2023

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात; यासाठी घेतले पाच हजार

May 31, 2023

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

May 31, 2023

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group