नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा रूग्णालय ते शिवाजीनगर दरम्यान सीटीलिंक मधून बसप्रवास करीत असतांना महिलेच्या गळयातील सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाक्षी नानाभाऊ जाधव (६० रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव या मंगळवारी (दि.१४) ठक्कर बाजार परिसरात आल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या सिव्हील हॉस्पिटल समोरील बसथांब्यावरून शिवाजीनगर बसमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली.
बसमधील गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारेस ९१ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. अधिक तपास पोलिस नाईक महाले करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1636657980379910144?s=20