नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये तरूणीसह एका विवाहीतेचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी पंचवटी आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरूणीची वाट अडवित एकाने विनयभंग केला. तर दुस-या घटनेत भावजयीचा तिच्या दिराने विनयभंग केला असून त्यास पतीची संमती असल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पतीचा मोठा भाऊ गेल्या दिड वर्षापासून या ना त्या कारणाने अंगलट करून विनयभंग करीत आहे. याबाबत पतीकडे वाच्यता केली असता त्यानेही भावासोबत शरिर संबध प्रस्थापित करण्यास सांगितल्याचा आरोप पीडितेने केला आहे. बेडरूममध्ये शिरून संशयिताने बदनामीसह माहेरच्या मंडळीचे बरे वाईट करण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आरिफ व आसिफ खान नामक दोघा भावांविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.
दुसरी घटना पंचवटी परिसरात घडली. येथे राहणारी पीडित तरूणी मंगळवारी (दि.१४) सकाळच्या सुमारास दिंडोरीरोडवरील मार्केट यार्ड भागात गेली असता रोहित उर्फ लाल्या अजय गायकवाड (१९ रा.पाण्याच्या टाकीजवळ,वाघाडी) या संशयिताने महालक्ष्मी थेअटर जवळील म्हसोबा मंदिर परिसरात पीडितेची वाट अडवित मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत तिचा हात पकडून विनयभंग केला. पीडितेने कशीबशी सुटका करून तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिचा पाठलाग केला. त्यामुळे भेदरलेल्या पीडितेने हाकेच्या अंतरावरील पंचवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.