नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेरी रासबिहारी लिंकरोड भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे स्लॅबचे काम करीत असतांना चौथ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. कैलास धोंडीराम कोरडे (४१ रा.गणेशगाव ता.त्र्यंबकेश्वर) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोरडे बुधवारी औदूंबर लॉन्स परिसरात सुरू असलेल्या श्रीजी दर्शन अपार्टमेंट या नुतन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्लॅबचे काम करीत असतांना ही घटना घडली. स्लॅब टाकत असतांना अचानक तोल गेल्याने तो चौथ्या मजल्यावरून जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने ठेकेदार प्रकाश पटेल यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी डॉ. राहूल पाटील यांनी त्यास मृत घोषीत केले.