India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दुचाकीस्वारांनी टेम्पो अडवित चालकास केल बेदम मारहाण; रोकड व मोबाईल हिसकावून नेले

India Darpan by India Darpan
March 7, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडनेर पाथर्डी मार्गावर दुचाकीस्वार त्रिकुटाने टेम्पो अडवित चालकास बेदम मारहाण करून लुटल्याची घटना घडली. या घटनेत चालकाच्या खिशातील रोकड व मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत टोळक्याने धुम ठोकली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असगरअली अकबरअली अन्सारी (३३ मुळ रा.सिध्दार्थ नगर,उत्तरप्रदेश हल्ली पळसे ता.जि.नाशिक) या टेम्पो चालकाने तक्रार दाखल केली आहे. अन्सारी पळसे येथील भंगार व्यापारी चौधरी यांच्या टेम्पोवर चालक म्हणून कामास आहेत. रविवारी (दि.५) ते पाथर्डी परिसरातून भंगार गोळा करून शिंदे पळसेच्या दिशेने टेम्पो एमएच ०४ ईवाय ८८४३ घेवून जात असतांना ही घटना घडली. विहीतगाव परिसरात पाठीमागून अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या त्रिकुटाने टेम्पो अडवून चालकास कट का मारला याबाबत जाब विचारला. यावेळी संतप्त दोघांनी टेम्पोच्या चालक कॅबीनमध्ये जावून चालकास बेदम मारहाण करीत त्याच्या खिशातील दहा हजाराची रोकड व मोबाईल असा सुमारे १५ हजाराचा ऐवज बळजबरीने काढून पोबारा केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक वांजळे करीत आहेत.


Previous Post

१५ ठिकाणी छापे… ५.५१ कोटींचे दागिने… १.२१ कोटी रोकड… ईडीच्या कारवाईने अनेकांचे डोळे पांढरे

Next Post

बेकायदा दारु विक्री करणा-या दोन अड्डयावर पोलिसांचा छापा; एक जण ताब्यात, दारू साठाही हस्तगत

Next Post

बेकायदा दारु विक्री करणा-या दोन अड्डयावर पोलिसांचा छापा; एक जण ताब्यात, दारू साठाही हस्तगत

ताज्या बातम्या

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023

चिपळूण-कराड रेल्वे मार्ग प्रकल्पाचे घोडे नेमके कुठे अडले? राज्य सरकार म्हणाले

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group