नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावर पतीसमवेत देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्याने ओरबाडून नेले. याप्रकरणी वनिता वाल्मिक जाधव (४६ रा.पंचवटी प्राईड,पेठफाटा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव दांम्पत्य शनिवारी (दि.४) रात्री देवदर्शनासाठी गोदाघाटावर गेले होते. इंद्रकुंट देवस्थानसमोरून ते रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. गर्दीतून दोघे जात असतांना समोरून आलेल्या तीस वर्षीय भामट्याने वनिता जाधव यांच्या गळय़ावर थाप मारून सुमारे ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. पतीने संशयिताचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र भामटा गर्दीतून पसार झाला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.