नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईलचे लोकेशनवरुन नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी राजस्थान येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून आणलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंकज उमेश यादव ( २०, रा. कुंभीगाव, मेघोल, सरीयाबाजार, बेगुसराय, बिहार) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत ही अल्पवयीन मुलगी मिळाली. हा तरुण वीट भट्टीवर जेसीबी चालक आहे.
राजस्थान भरतपुर पोलिसांनी या घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिल्यानंतर ही कारवाई केली. राजस्थान पोलिसांनी भरतपूर राजस्थान येथील एका अल्पवयीन मुलीला पंकज राह (शिवहर, बिहार) याने फुस लावुन गैरमार्गाकरीता पळवुन आणल्याचे सांगितले. त्यानंतर या तरुणाचे मोबाईल लोकेशन तपासण्यात आल्यानंतर लोकेशन नाशिकरोड रेल्वे स्टेशन मालधक्का परिसरात येत होते. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर संशयित आरोपी याचा पत्ता हा सुभाषरोड झोपडपट्टी येथे मिळून आला. रेल्वे परिसरात पूर्वी शेंगा विक्री करीत असल्याची माहाती मिळाली. त्याचा अधिक तपास केला असता दोघांना ताब्यात घेण्यात आले. आहे. सदर तरुण राजस्थान पोलिसांना चकवा देऊन सतत दिल्ली, गोवा असे शहर बदली करीत होता. नाशिक रोड रेल्वे पोलिसांच्या जलद हालचालीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक निकम, शैलेन्द्र पाटील, विलास इंगळे, विजय कपिले यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक सागर वर्मा व आरक्षक मनिषकुमार सिंग यांच्या सहकार्याने तपास करण्यात आला.