India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चारचाकींनी दिलेल्या धडकेत दोन जण जखमी; वेगवेगळ्या भागात झाले दोन अपघात

India Darpan by India Darpan
March 2, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया भागात भरधाव चारचाकींनी दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला अपघात जयभवानीरोडवर झाला. देवळाली गावातील उमर गफार शेख (२० रा.जोशी चाळ,पाटील गॅरेज मागे) हा युवक गेल्या सोमवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास आपल्या बुलेट एमएच १५ एफएस ६२६२ दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. जयभवानीरोडने तो प्रवास करीत असतांना कदम डेअरीसमोर भरधाव आलेल्या एमएच १५ जीएक्स ६७२९ या चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या घटनेत शेख याच्या दोन्ही पायांना आणि डोळ््यास दुखापत झाली असून याप्रकरणी सदर वाहनचालकाविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत. दुसरी घटना दिंडोरी नाक्याजवळ घडली. शैलेश संपत मुर्तडक (३२ रा.गल्ली नं. २ अवधूतवाडी) हे बुधवारी (दि.१) भावजयी रूपाली मुर्तडक यांच्या समवेत अवधूतवाडी येथून परिसरातील सप्तशृंगी माता मंदिराच्या दिशेने पायी जात असतांना दिंडोरीनाक्याकडून म्हसरूळच्या दिशेने भरधाव जाणा-या चारचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात शैलेश मुर्तडक गंभीर जखमी झाले असून भावजयी रूपाली मुर्तडक यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघातानंतर वाहनासह पसार झालेल्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक सानप करीत आहेत.


Previous Post

रिक्षा प्रवासात मुंबईच्या महिलेच्या पर्स मधील दागिणे चोरट्यांनी केले लंपास

Next Post

कसब्यात बिचकुले आणि दवे यांना किती मते मिळाली? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Next Post

कसब्यात बिचकुले आणि दवे यांना किती मते मिळाली? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 28, 2023

राज्यातील या ५ शहरांमध्ये सुरू होणार लू लू मॉल तर येथे सुरू होणार अन्न प्रक्रिया उद्योग

March 28, 2023

जालना, अंबड शहर पाणीपुरवठा योजनेबाबत झाला हा महत्वाचा निर्णय

March 28, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुण्याच्या पाणी पुरवठ्याबाबत पालकमंत्र्यांनी दिले हे निर्देश

March 28, 2023

नागरिकांना आता कमी दरात मिळणार वाळू… असा आहे सरकारचा मेगाप्लॅन…

March 28, 2023

पठाणच्या अभूतपूर्व यशानंतर शाहरुख खानने घेतली ही आलिशान कार… एवढी आहे तिची किंमत.. अशी आहेत वैशिष्ट्ये

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group