नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचक शिवारात फेरफटका मारून घरी परतलेल्या वृध्दाचा चक्कर येवून पाय-यांवर पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. अशोक लालू साळवे (६७ रा.वैभवलक्ष्मी अपा.पंचक शिवार,जेलरोड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साळवे सोमवारी (दि.२७) सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. दुपारच्या सुमारास ते आपल्या घरी परतले असता ही घटना घडली. अचानक चक्कर आल्याने ते घराच्या पायºयांवर पडले होते. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने मुलगा सम्राट साळवे यांनी त्यांना तातडीने बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.