नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालिमार परिसरातील नेपाळी कॉर्नर भागात जिह्यातून हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडीपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई करण्यात आली. हनी पुनमचंद बरेलीकर (२५ रा.दरबाररोड दुनशहा बाबा दर्गा जवळ) असे अटक करण्यात आलेल्या तडीपाराचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरेलीकर याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे शहर पोलिसांनी त्याच्यावर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर व जिह्यातून त्यास तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांना रविवारी (दि.२६) तो नेपाळी कॉर्नर भागात येमार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता तो पोलिसांच्या जाळ््यात अडकला. याबाबत शिपाई धनंजय हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक कोळी करीत आहेत.