नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओमकारनगर भागात रस्त्याच्या बाजूला केरकचरा टाकून घराकडे परणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी हेमलता सुभाष बधाण (५१ रा.जोगेश्वरी रो हाऊस,अंजना पार्क बिरसामुंडा हॉस्पिटल शेजारी) या महिलेने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बधान या रविवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास आपल्या अंगणात झाडझुड करीत होत्या. घरासमोरील मोकळ््या भूखंडावर केरकचरा डून त्या रस्ता ओलांडत असतांना ही घटना घडली. किशोर सुर्यवंशी मार्गाकडून भरधाव आलेल्या डबलसिट दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळ््यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र ओरबाडून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.